Share

कोरोनाला हरविण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत निवृत्त लष्करी जवान उतरले मैदानात

Published On: 

मालेगाव : मालेगावमध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पोलिसांच्या मदतीला आता मालेगाव तालुक्यातील निवृत्त लष्करी जवान सुध्दा सरसावले आहेत. कोरोनामुळे संचारबंदी लावण्यात आली असल्याने पोलिसांवर अधिक ताण पडत आहे. पोलिसांच्या मदतीसाठी जवळपास 80 निवृत्त जवान पुढे आले असून, पोलिसांचा ज्या ज्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.

एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. शहरातील भागात हे निवृत्त जवान आपली सेवा बजावणार आहेत, मालेगावचे अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी या सर्व जवानांना मास्कचे वाटप करुन मार्गदर्शन केले आहे. देशाच्या सिमेचे रक्षण केले, आता कोरोना पासून देशातील बांधवांचे रक्षण करायचे आहे, याच भावनेतून हे जवान मदतीसाठी पुढे आले आहेत.

दरम्यान,राज्यातील करोनाबाधितांची संख्या काल ४६६६ वर पोहोचली आहे. सोमवारी नवीन ४६६ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी नऊ तर आतापर्यंत २३२ रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

दुसरीकडे मुंबईतील करोनाबधितांचा आकडा ३०९० वर गेला आहे. २४ तासांत १५५ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर खासगी प्रयोगशाळांतील १३७ रुग्णांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सोमवारी एकूण २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण १३८ जणांनी प्राण गमावले आहेत. तर अजून ३६३ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सोमवारी ८४ रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून आतापर्यंत ३९४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!