Share

सेवानिवृत्त ग्रामसेवक विजयकुमार पाटील यांच्याकडून पंतप्रधान निधीस ११ हजार रुपयाची मदत

Published On: 

🕒 1 min read

प्रदीप मुरमे :- निलंगा तालुक्यातील केळगाव या गावचे जेष्ठ नागरीक विजयकुमार पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीस ११ हजार रुपयाची आर्थिक मदत देवू केली आहे.

विजयकुमार पाटील हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. सेवेत असताना उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट ग्रामसेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आजही विविध सामाजिक कार्यात ते सातत्याने सहभागी असतात. आपल्या देशावर सध्या कोरोनाचे मोठे संकंट ओढवल्यामुळे पंतप्रधान सहाय्यता निधीस ११ हजार रुपयाची आर्थिक मदत देवू करुन त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे ११ हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी वैभव पाटील उपस्थित होते.देशासमोरील कोरोनाचे संकंट लवकर कमी न झाल्यास आपली वर्षभराची पेन्शन पंतप्रधान सहाय्यता निधीस देण्याची आपली तयारी आसल्याचे पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

देशाने आपल्याला काय दिले याचा विचार न करता आपण देशासाठी काय देवू शकतो याचा विचार करण्याची हिच वेळ आहे. देशासमोर आज कोरोनाचे मोठे संकट ओढवले आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरीकाने आपआपल्यापरीने देशासाठी आर्थिक योगदान देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकाने पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करावे असे आवाहन विजयकुमार पाटील यांनी यावेळी बोलताना केले. तालुक्यातील जेष्ठ नागरीकांसह ग्रामस्थांनी विजयकुमार पाटील यांनी पंतप्रधान निधीस देणगी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!