Share

रविवारच्या (22 मार्च) जनता कर्फ्युत रिटेल व्यापारी सहभागी होणार

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (रविवार, 22 मार्च) रोजी पुकारलेल्या जनता कर्फ्युमध्ये सर्व रिटेल व्यापारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे रविवारी सर्व व्यवहार व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे घेण्यात आला असून संघटनेचे सर्व सभासद आपली दुकाने बंद ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कटीबद्ध आहेत, असे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष व कैट महाराष्ट्र चे सचिव सचिन निवंगुणे यांनी कळविले आहे.

दरम्यान, कैट व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतीय व महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी देशातील सर्व रिटेल व्यापाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्युत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या टास्क फोर्स ला कोरोनातून सावरण्यासाठी व्यापाऱ्यांना बँकांकडून मदत करण्याची विनंती केली आहे. तसेच, व्यापाऱ्यांना जीएसटीसह इतर सर्व रिटर्न 30 जूनपर्यंत भरण्याची मुदतवाढ देण्यात यावी. आणि व्यापाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या हप्ते पुढील 6 महिन्यांसाठी स्थगित करण्यात यावेत अशीही मागणी केली असल्याची माहिती कैट महाराष्ट्र चे उपाध्यक्ष सुरेश ठक्कर व सचिव सचिन निवंगुणे यांनी दिली.

पुण्यात गेल्या पाच दिवसांपासून कोरोना ला रोखण्यासाठी दूध व संलग्न पदार्थ, औषधे, अन्नधान्याची किराणा दुकानांव्यतिरिक्त सर्व व्यापार बंद आहे. आणि उद्या रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्युत रिटेल व्यापारी सहभागी होणार आहेत, असेही सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!