मुंबई : कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाला आहे. त्यामुळे GDPचे अपेक्षित उद्दिष गाठणे आव्हानात्मक असणार आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. कोरोनामुळे देशात आणि जगात मंदी आली आहे. त्यामुळे घटत्या मागणीमुळे बाजारात महागाई होणार आहे.
या मंदीवर मात करण्यासाठी रिझर्व्ह रेपो दर हा ४.९० टक्क्यावरून ४ टक्क्यावर आणला आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजदर हे ५.१५% वरून ४.४% वर आले आहे. तसेच अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याज दरात घट करण्यात आली आहे. त्यामुळे ईएमआयचे हफ्ते हे कमी होणार आहेत, असेही शक्तीकांत दास म्हणाले. तर ईएमआयचे हफ्ते पुढील 3 महिन्यांसाठी स्थगित करावेत असे आवाहनही त्यांनी व्यापारी बँकांना केली आहे.
Repo rate reduced by 75 basis points to 4.4.%. Reverse repo-rate reduced by 90 basis points to 4%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/eBb0WPAG21
— ANI (@ANI) March 27, 2020
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेली सर्वात मोठी घोषणा असल्याचं बोललं जात आहे. रेपो दरात घट केल्याने गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना येण्यास मदत होईल असे शक्तीकांत दास म्हणाले.


