अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात रोज ८०० ते ९०० कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालये व कोविड सेंटर सध्या फुल आहेत. मध्यंतरी जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्शनची कमतरता असल्याने आ.संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी काही इंजेक्शन पाठविले आहेत. ते गरीब रुग्णांना मोफत देण्यात येणार असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली आहे.
मध्यंतरी आ.संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन अहमदनगर जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा असल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यानुसार खा.शरद पवार यांनी रेमडीसीवीरचा साठा नगरकरांसाठी पाठविला असून, तो गरजू रुग्णांना मोफत दिला जाणार आहे अशी माहिती आ.जगताप यांनी दिली.
खा.शरद पवार यांनी आ.जगताप यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून ४८ रेमडीसीवर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून ते नगरकरांसाठी पाठविले. आ.जगताप यांनी इंजेक्शनचा साठा शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, पराग झावरे, भूपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- फणडवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान
- ‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक
- स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर भाजपचेच:- महापौर बाबासाहेब वाकळे
- कोरोना काळात सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे- अण्णा हजारे
- अहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच; काल दिवसभरात १४ मृत्यूसह ७५६ नवे बाधित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

