मुंबई– कोरोनाने देशासह संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे भारतात प्रतिबंधक उपाय म्हणून महिन्याहुन अधिक काळ लॉक डाऊन जाहीर केला होता. यामुळे सर्वच व्यापार, उद्योग, व्यवसाय बंद असून आर्थिक संकट आता समोर उभं राहत आहे. अजून देखील लॉक डाऊन बद्दल अनिश्चितता असून सर्व जनजीवन सुस्थित येण्यास किती कालावधी लागेल या बद्दल शंका निर्माण होत आहे.
अशातच अनेक हजारो कोटींचा फटका हा सर्वच उद्योगांना बसत आहे.त्यामुळे आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी काही उद्योगांना वेतनकपात, नोकरकपात यासारखे कटू निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यातच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एक मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून स्वतः रिलायन्सचे चेअरमन मुकेस अंबानी यांनी त्यांचं वेतन किंवा कामाचा मोबदला न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
रिलायन्सच्या वतीने कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘या संकटकाळात कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य आणि सुरक्षा हा आमचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. त्यासाठी २४ तास इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.’
‘पेट्रोकेमिकल्स आणि शुद्धीकरण उत्पादनांना सध्याच्या परिस्थितीत फार मागणी नाही. त्यामुळे हायड्रोकार्बन्सचा उद्योग संकटात आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कठोर नियोजन आवश्यक आहे आणि यात आपल्या सगळ्यांचा सहभाग हवा आहे. थोडी बचत आणि कॉस्ट कटिंगचे निर्णय हे त्यासाठी घेण्यात आले आहेत. ते १ एप्रिलपासून लागू झालेले आहेत. ‘ हे वृत्त IBN लोकमतच्या माहितीनुसार मिळत आहे.
दरम्यान, रिलायन्स ने जाहीर केलेल्या पत्रात १ एप्रिल पासून लागू केलेल्या कॉस्ट कटिंगसाठी काही निकष जाहीर केले असून त्याची माहिती दिली आहे. त्यानुसार, वार्षिक १५ लाखांहून कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या कोणताही बदल केला जाणार नसल्याचं कंपनीने सांगितले आहे. तर वार्षिक १५ लाखांहून अधिक वेतन असणाऱ्यांच्या पगारात १० टक्क्यांनी कपात करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

