Share

प्रेरणादायी : मुंबईत ९७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

Published On: 

मुंबई : कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं सर्वांचं मनोबल वाढवणारी एक सकारात्मक घटना मुंबई शहरात घडली आहे. मुंबईच्या प्रिन्स अली खान रुग्णालयातून कोरोना बाधित 97 वर्षाच्या आमीना सुनेसरा यांना सात दिवसांच्या उपचारानंतर आज सुखरुप घरी सोडण्यात आले.

वय जास्त असल्यामुळे आणि कमी ऐकू येत असल्याने उपचार करण्यास काही अडचणी आल्या. पण आमीना यांच्या जिद्दीपुढे सर्व अडचणींनी लोटांगण घातले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. आमीना यांच्या कुटुंबातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आठ दिवसांपूर्वी आमीन सुनेसरा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लक्षण ही दिसत होती. त्यांना मुंबईच्या प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि फक्त सात दिवसातच कोरोनावर मात करत आमीना सुखरुप घरी परतल्या.

चना खरेदीसाठी अतिरिक्त गोदाम, बारदाना आणि ग्रेडरची तातडीने व्यवस्था करावी- खा.मुंडे

दरम्यान, राज्यात शुक्रवारी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.

बाळासाहेब थोरातांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!