Share

‘२०१४ पासून सत्ता गेली आणि आपल्याला संघटनेचे महत्त्व कळले’

Published On: 

मुंबई : “एकदा सत्तेत आलो की आपण निश्चिंत होऊन जातो. आता आपल्याकडे लोक येतील आणि टिकून राहतील असे आपल्याला वाटते. पण एक अनुभव सगळ्यांनी घेतला. पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला तेव्हा आपण १५ वर्षे सत्तेत होतो. २०१४ पासून सत्ता गेली आणि आपल्याला संघटनेचे महत्त्व कळले असे वक्तव्य राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी  केले.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या पहिल्या सत्राला आज दिमाखात सुरुवात झाली. शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल पटेल यांच्या सन्माननीय उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरासाठी खा. माजिद मेमन, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आ. किरण पावसकर यांच्यासह पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.

सत्तेत असताना सगळेच बरोबर असतात. पण सत्ता गेल्यानंतर जे बरोबर असतात तेच खरे कार्यकर्ते. गेल्या पाच वर्षांत संघटनेचे काम केलेले अनेक चेहरे मला दिसत आहेत. मला जरी राज्यमंत्रीपद मिळाले असले तरी मी संघटनेचे काम करीत राहीन असा विश्वास देखील पक्षाला दिला.

पर्यटनमंत्रीही असल्यामुळे अजितदादा यांच्याकडे गेल्यावर त्याठिकाणी मुंबईतील हेरिटेज इमारतीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी १०० कोटी रुपये देण्यात आले. आपल्या नेत्यांकडून जी कामे होतात, ठोस निर्णय घेतले ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे काम लोकांपर्यंत नेले पाहिजे. निवडणुका आल्यानंतर पत्रके छापून ही कामे महाविकास आघाडीने केली हे ओरडून सांगण्याची वेळच येऊ देऊ नका. पुढच्या पाच वर्षात संघटनेचे काम लोकांपर्यंत पोहोचवा असं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले .

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!