मुंबई : नुकतंच आता नेहाने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली होती. नेहाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात ती तिचा पती रोहनप्रीतसोबत दिसत आहे. या फोटोवर तिने ख्याल रखा कर असा हॅशटॅगही दिला आहे. या पोस्टमधील फोटोवरून ती गर्भवती असल्याचं दिसूनअली. फोटोच्या खाली रोहनप्रीत याने आता तर अजून काळजी घ्यावी लागेल अशी कमेंट केली. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या या गोड बातमीवर त्यांचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.
नेहा कक्कर लवकरच आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. नेहा कक्करच्या प्रेग्नंसीवर अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. नेहा आणि रोहनप्रीत दोन महिन्यांपूर्वीच 24 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे केवळ चाहतेच नाही, तर अनेक युजर्सही कॉमेंट करून नेहाच्या प्रेग्नंसीवर आश्चर्य व्यक्त करत होते. नेहाच्या या फोटोमागचा खरा अर्थ आता समोर आला आहे.
नेहा खरोखर गर्भवती नसून तिने नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी हा फंडा वापरला असल्याचं दिसून येत आहे. नेहाने आता तिच्या नव्या गाण्यासंदर्भातला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहनप्रीत आणि नेहाचा आधीचाच फोटो यात दिसून येत आहे.
‘खयाल रखा कर’ या तिच्या नव्या गाण्याचं प्रमोशन ती सध्या करत आहे. नेहाने स्वत: हे गाणं गायलं आहे आणि या म्युझिक व्हिडीओमध्ये तिच्यासोबत रोहनप्रीतही झळकणार असल्याचं दिसून येत आहे. 22 डिसेंबर रोजी तिचा नवा म्युझिक व्हिडीओ रीलिज होणार आहे.
https://www.instagram.com/p/CI97KWiDeYZ/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- मुंबईत अंबानी-अदानी विरोधात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
- राष्ट्रीय महामार्गावर 1 जानेवारी पासून ‘फास्टॅगची’ अंमलबजावणी
- ई-कॉमर्स नंतर आता अमेझॉन आणणार अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार !
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

