Share

पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी या जिल्ह्याचे ‘राजे’ पोहचले थेट बांधावर

Published On: 

अहेरी: जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे शेत पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शेतातील नुकसानीचे पाहणी करण्याकरिता अहेरी तालुक्यातील देवलमरी व परिसरात नुकतीच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दौरा केला. विशेष म्हणजे इतरांप्रमाणे त्यांनी बैठकांचे सत्र न घेता थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे अहेरी तालुक्याला शेतकऱ्यांना  पाण्याचा मोठा फटका बसला आहे. त्यातच अहेरी तालुक्यातील देवलमरी व परिसरात शेतीचे पूर्णत: नुकसान झाले असून, शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता देवलमरी, मुदुमतुरा, वट्रा आदी भागातील थेट शेतीच्या बांधावर जाऊन कापूस, धान व अन्य पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी करून चिंता व्यक्त केली.

इस्तारी मारिन, संजय बुजाडी, ईस्तारी निष्टुरी, विजु गवडेवार आदी व अन्य शेतकऱ्यांनशी संवाद साधून शेतक धीर दिला. कापसाचे, धानाचे व अन्य उभे पीक नष्ट झाल्याने मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आ. आत्राम यांनी दिले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, राकॉंचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, सतीश दोंतुलवार, नगर सेवक नितीन दोंतुलवार, सुरेंद्र अलोने, प्रभाकर वरगंटीवार, श्रीनिवास मगडीवार, मखमुर शेख, मिरगा उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!