Share

सोन्या काळभोरवर येरवडा कारागृहात हल्ला

Published On: 

पुणे : रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खूनाच्या आरोपात अटकेत असलेल्या सोन्या काळभोरवर येरवडा कारागृहात अनिकेतच्या नातेवाईकांनी हल्ला केला. सोन्या काळभोर याला निगडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहात पाठवले होते. सोन्या काळभोर कारागृहात समोर येताच जाधवच्या नातेवाईकांनी त्याच्यावर लोखंडी बादली फेकून हल्ला केला.

यामध्ये काळभोर याच्या डोक्याला जखम झाली आहे.रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा सोन्या काळभोर व त्याच्या साथीदारांनी आकुर्डी येथे गेल्या महिन्यात निर्घृण खून केला होता. त्यानंतर रावण टोळी व सोन्या काळभोर यांच्या टोळीत शीत युद्ध सुरु झाले.

मात्र, निगडी पोलिसांनी काळभोर व त्याच्या इतर साथीदारांना अटक करून येरवाडा कारागृहात रवाना केले आहे. येरवडा कारागृहात अनिकेत याचा वाघमोडे नामक नातेवाईकही एका गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. याच नातेवाईकासमोर सोन्या काळभोर आला असता त्याला राग अनावर झाला व त्याने हातातील बादली त्याला फेकून मारली. याप्रकरणी त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले असून संबंधीत आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!