टीम महाराष्ट्र देशा – देशभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यमुळे देशातील बहुतांश नागरिक हे सोशल मिडियावर आपला वेळ घालवत आहे. याच काळात आता काही पोस्ट व्हायरल होत आहे. त्याची सत्यता न पडताळता लॉक त्या फॉरवर्ड करत आहेत.
अशीच एक पोस्ट टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा यांच्या नावाने फिरत आहे . हे पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्ट नुसार टाटा अर्थतज्ञ जो दावा करत आहेत कि भारतीय अर्थव्यवस्था कोरोनामुळे अडचणीत येईल ही गोष्ट आपल्याला पटत नाही , आणि भारतीय अर्थव्यवस्था लवकरच जोमाने वाढेल.

ही पोस्ट मी लिहलेली नाही – रतन टाटा
आता रतन टाटा यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे. आपण असं काहीही लिहलं नाही. तसेच माझी विनंती आहे कि आपण समाज माध्यमांवर येणाऱ्या माहितीची सत्यता तपासून घ्यावी.त्यांनी ट्वीटरवर याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले,
‘या पोस्टमधील मी बोललेलो नाही किंवा लिहिलेही नाही. मी आपणास व्हॉट्सअॅप आणि सोशल माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित माहितीची सत्यता तपासण्याची विनंती करतो. मला काही सांगायचं असेल तर ते मी माझ्या अधिकृत चॅनेलवर म्हणेन. आशा आहे की आपण सुरक्षित आहात आणि काळजी घ्या.’
This post has neither been said, nor written by me. I urge you to verify media circulated on WhatsApp and social platforms. If I have something to say, I will say it on my official channels. Hope you are safe and do take care. pic.twitter.com/RNVL40aRTB
— Ratan N. Tata (@RNTata2000) April 11, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

