Share

झपाट्याने वाढतीये देशाची लोकसंख्या ; १३६ कोटींवर पोहचला आकडा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून ती आता १३६ कोटींवर पोहचली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०१० ते २०१९ या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या १.२ टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आले आहे. लोकसंख्या वाढीची हि टक्केवारी चीनपेक्षा दुप्पट असल्याचे समोर आले आहे.

वाढती लोकसंख्या हि देशासमोर एक मोठी समस्या आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम दिसून येतील. सध्याची परिस्थिती पाहता देशात शिक्षण, रोजगार, आरोग्य यांसारख्या समस्या आहेत. आणि आता त्यात भर म्हणून अनियंत्रित वाढती लोकसंख्या. १९९४ मध्ये ती ९४.२२ कोटी इतकी होती. तत्पूर्वी १९६९ मध्ये ती ५४.१५ कोटी इतकी होती. जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन २०१९ मध्ये ती ७७१.५ कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी ७६३.३ कोटी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०१० आणि २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येत १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे. ही १९९४ मध्ये १२३ कोटी तर १९६९ मध्ये ८०.३६ कोटी इतकी होती. या अहवालानुसार, भारतात १९६९ मध्ये प्रतिमहिना एकूण जन्मदर ५.६ टक्के इतका होता. तो १९९४ मध्ये ३.७ टक्के राहिला. मात्र, भारताने जन्मावेळच्या सरासरी आयुर्मानात सुधारणा नोंदवली आहे.

वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणणे ही काळाची गरज बनली असून त्यासाठी वेळीच पाऊले उचलने अत्यंत महत्वाचे आहे. नाहीतर भविष्यात पुढच्या पिढ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार यात शंका नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!