🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह नेहमीच आपल्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असतो. तसेच रणवीरला बॉलीवूडमध्ये यारांचा यार म्हणून देखील संबोधले जाते. अशीच एक यारी रणवीरच्या चाहत्यांना पाहायला मिळली.
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी बरोबर असलेल्या बॉन्डिंगमुळे सध्या रणवीर चर्चेत आला आहे. रणवीर आणि धोनी नुकतेच मुंबईतील एका स्टेडियमममध्ये फुटबॉल खेळताना दिसले. याच मैदानावर रणवीर आणि धोनीमध्ये जिगरी यारी पाहायला मिळली. या फुटबॉल मैदानावरील दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हे दोघं एकमेकांशी बोलताना तसंच जवळच्या मित्रांप्रमाणे गळाभेट घेताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CRwWEBSqKrX/?utm_source=ig_web_copy_link
त्यांची ही यारी पाहून रणीवर तसेच धोनीचे चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. रणवीर आणि धोनी हे दोघंही ऑल स्टार फुटबॉल क्लबचे सदस्य आहेत. धोनी आणि रणीवरनं रविवारी या फुटबॉल स्टेडियमममध्ये एकत्र फुटबॉलचा सराव केला. या सरावादरम्यानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
- उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर, साताऱ्यात; पूर परिस्थितीचा आढावा घेणार
- मुख्यमंत्री ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्तांशी साधणार संवाद
- ‘पाच वर्षांची असतानाही तूच जबाबदारी सांभाळलीस…’, प्रीतम मुंडेंकडून पंकजांना खास शुभेच्छा
- राज्यात पूर आणि दरड कोसळून १४९ जणांचा मृत्यू; १०० नागरिक बेपत्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
