🕒 1 min read
पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.
दिवसेंदिवस या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची धुरा भाजपचे माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ते तळ ठोकून आहेत.
दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच शरसंधान साधले आहे. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जशी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा काढून घेतली, तशी पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही’. अशी सिंहगर्जना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
तर, विरोधक पोटनिवडणुकीत मृत्यूचे भांडवल करुन अनुकंपाच्या नावाखाली जागा भरण्यासाठी मतं मागायला येतात, हे साफ चुकीचे आहे. आपल्याला लोकांना न्याय देता आला पाहिजे. लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडता आले पाहिजेत. अनुकंपाखाली जागा भरायला हे काय एसटी महामंडळ नाही, अशा शब्दात निंबाळकरांनी विरोधकांना सुनावले.
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लॉकडाऊनबाबत खोटी माहिती दिली;जनतेलाही फसवलं’
- ‘माझे प्राण माझीच जबाबदारी’ या भूमिकेत नागरिकांनाच शिरावे लागेल’
- कोरोनाची धास्ती : संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकला; आता परीक्षार्थीच करू लागले मागणी
- सचिनच्या प्रकृतीत सुधार ; लवकरच सोडणार घरी
- गुड न्यूज! परभणी जिल्ह्यात ८३० रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
