Share

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटलांना विधान परिषदेची उमेदवारी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपने वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढा हा आपला बालेकिल्ला गमवावा लागला होता.

विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तिघांनाही उमेदवारी देण्यास भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला लाल कंदील मिळाला. त्यामुळे त्यांचे राजकीय पूनर्वसन होणार की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना खऱ्या हिंदुत्वपासून दूर जात आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मनसेमध्ये येतील

विधानसभा निवडणुकीत बावनकुळे आणि खडसे यांचे तिकिट नाकारण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या विधानपरिषदेत त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा भाजप नेते व कार्यकर्त्यांना होती. विधान परिषदेबाबात एकनाथ खडसे यांनी इच्छाही व्यक्त केली होती. पण, यंदाही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

दरम्यान,भाजपकडून या निवडणुकीत महत्वाचं नाव आहे ते रणजितसिंह मोहिते पाटलांचं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितसिंह हे पहिले अध्यक्ष होते.2009 ते 2012 या कालावधीत रणजितसिंह मोहिते पाटील राज्यसभेत खासदार होते.

करमाड रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख : मुख्यमंत्री

मोहिते-पाटील घराणे सोलापूरमधलं राजकीय प्रस्थ आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील दीर्घकाळ मंत्री आणि काहीकाळ उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांनीही मोहिते पाटलांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी केली होती.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे भाजपचा सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रसार होण्यास मदत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुप्रिया सुळेंनी रक्षा खडसेंवर उधळली स्तुतिसुमने; एकनाथ खडसे म्हणाले…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!