Share

सुप्रिया सुळेंनी रक्षा खडसेंवर उधळली स्तुतिसुमने; एकनाथ खडसे म्हणाले…

Published On: 

जळगाव : दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 48 खासदारांपैकी आवडतं कोण? हा प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे या माझ्या आवडत्या महिला खासदार आहेत. धडपड करणारे नेतृत्त्व म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार रक्षा खडसेंवर स्तुतिसुमने उधळली होती.

याचाच धागा पकडत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते याबाबत जळगाव येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘चांगल्या कामाची दखल घेतली, तर राजकारणात चांगले दिवस येतील,’ असे खडसे म्हणाले.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की, ‘राजकारण्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं आहे. सुप्रियाताईंनी चांगलं काम केलं. आम्ही त्यांचं नेहमी कौतुक करत आलेलो आहोत,’ असे यावेळी बोलताना खडसे म्हणाले.

दरम्यान, रक्षा खडसे आणि सुप्रिया सुळे संसदेत एकत्र काम करतात. एकमेकांना सहकार्य करतात, त्यामुळे हे स्वाभाविकच आहे. चांगल्या कामाची जर दखल घेतली, तर राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ शकतात,’ असे खडसे म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!