Share

तुळजापूरमध्ये रंगणार राणाजगजित सिंह पाटील यांची प्रचारसभा – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा फोडणार प्रचाराचा नारळ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : तुळजापूर : तुळजापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार मधुकर चव्हाण यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची तलमवाडी येथे प्रचारसभा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व प्रदेशाध्यक्षांची सभा एकाच दिवशी होणार असल्याने विधानसभा प्रचाराला रंगत चढणार आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत गुरुवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता गृहमंत्री शहा यांची भाजप उमेदवार राणाजगजित सिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. तसेच तमलवाडी येथे कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आघाडी काँग्रेसचे उमेदवार मधुकर चव्हाण यांच्या प्रचारार्थ सकाळी अकरा वाजता सरस्वती मंगल कार्यालय येथे जाहीर सभा पार पडेल.

भाजपा ने अमित शहा यांची रेकॉर्ड ब्रेक सभा करण्याचा संकल्प केला आहे. सकाळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची सभा होणार असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या टिकेला भाजपाध्यक्ष शहा उत्तर देणार असल्याने या दोन्ही सभेत आरोप प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जाणार आहात.

महत्त्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181805148063948800?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181835478711988224?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!