Share

रामदास कदम यांना ॲाडिओ क्लिप भोवणार, उद्धव ठाकरे नाराज असल्याने आमदारकी जाणार?

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार रामदास कदम यांना वरिष्ठांची नाराजी चांगली महाग पडण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांची आमदारकी कायम राहणार नसल्याची शक्यता आहे. वादग्रस्त ॲाडिओ क्लिप आणि त्यानंतरच्या बॅनरबाजीने पक्षात नाराजी आहे. ही नाराजी रामदास कदम यांना चांगलीच महागात पडणार आहे.

रामदास कदम यांच्याविरोधात पक्षप्रमुख आणि शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये आता रामदास कदम यांचं नेतृत्व राहतं की, जातं? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रामदास कदम हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. कदम यांचा विधान परिषदेतील कालावधी डिसेंबरअखेर संपणार आहे. पक्षाकडून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. प्रकृतीच्या कारणामुळे कदम सध्या राजकारणातून अलिप्त आहेत. त्यामुळे कदम यांच्या जागी शिवसेना नव्या चेहऱ्याला संधी देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

रामदास कदम यांची कारकीर्द
२००५ मध्ये रामदास कदम यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली. सलग चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या रामदास कदमांचा २००९ मध्ये मात्र पराभव झाला होता. तेव्हा रामदास कदमांचे काय होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवत मोठी संधी दिली. २०१० मध्ये रामदास कदम विधानपरिषदेवर निवडून गेले. २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. २०१६ मध्ये पुन्हा त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली. २०१९ मध्ये त्यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेचा कोकणातील चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. कोकणात राणेंना टक्कर देणारा नेता म्हणून रामदास कदम हे नाव घेतलं जातं. शिवसेनेतील पहिल्या फळीतील एक आक्रमक आणि वजनदार नेते म्हणून रामदास कदम यांची आजही महाराष्ट्रात ओळख आहे.

यामुळे उद्धव ठाकरे कमालीचे नाराज
मंत्रिपदावरून बाजूला केल्यापासून कदम नाराज असल्याचे बोलले जात होते. त्याच नाराजीतून त्यांनी अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी तसा जाहीर आरोप केला होता. त्यानंतर रामदास कदम व आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे कदम यांच्यावरील संशय बळावला होता. या संपूर्ण घटनाक्रमामुळे उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहेत. त्यांची नाराजी आणि शिवसैनिकांचा रोष टाळण्यासाठी रामदास कदम हे यंदाच्या दसरा मेळाव्यालाही गेले नाहीत. आता आमदारकी नाकारून त्यांच्यासह पक्षातील अनेकांना योग्य तो संदेश देण्याचं पक्ष नेतृत्वानं ठरवल्याचं बोलले जाते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!