पुणे – एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधान परिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत. त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिली आहे.
या ऑफरबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की, प्राथमिक चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्याशी यासंदर्भात थेट बोलणं झालेलं नाही. जयंत पाटील माझ्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते, त्यावेळी आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. यापुढे अजूनही चर्चा होणार आहे.
दरम्यान, विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्यामधील किमान चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे शेट्टी यांच्यासारखा अनुभवी नेता विधानपरिषदेत जावा अशी शरद पवारांची भूमिका असल्याचं कळतंय.
दरम्यान, आता या मुद्द्यावरून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मुकुंद किर्दत यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली. राजू शेट्टी या अभ्यासू नेत्याला विधानपरिषदेत संधी मिळणे ही चांगली बाब आहे. खरेतर ते लोकनेते आहेत. त्यांनी लोकनिधीतून लढवलेल्या निवडणुका हा सामान्य कार्यकर्तापुढचा आदर्श आहे. त्यांना कधीकाळी सरंजामी विचाराच्या राष्ट्रवादीने रोखण्याचा प्रयत्न केला तर कधी भाजपने त्यांचा भ्रमनिरास केला. त्यामुळे या लोकनेत्याने सध्या कुणाच्याच आडोश्याला न जाता कोरोना संकटकाळात शेतकऱ्यांच्या समस्या आणि कल्याणकारी धोरणे राबवण्यासाठी आग्रही रहात तिसरा पर्याय सक्षम करण्यात आघाडीवर असायला हवे असे त्यांचा चाहता म्हणून निश्चित वाटते हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ ; नव्याने ३२५४ रुग्णांची नोंद
‘पवारांनी दिलेला आमदारकीच्या प्रस्तावाच्या संधीचे सोने राजू शेट्टींनी करावं’
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचं निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

