मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईला बळ देण्यासाठी गो कोरोना चा विश्वव्यापी नारा देणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी लॉकडाऊनच्या काळात बांद्रा येथील आपल्या निवासस्थानी दररोज गरीब गरजूंना अन्नधान्य भोजनदान देण्याचे अविरत सेवाकार्य मागील 34 दिवसांपासून सुरू ठेवले आहे. तोच आदर्श घेऊन देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील गरजूंना अन्नदान; रेशन अन्नधान्य स्वरूपात मदत करण्याच्या कामात पुढाकार घेतला आहे.
मणिपूर मधील रिपाइं ( आठवले ) चे प्रमुख कार्यकर्ते महेश कुमार यांनी आतापर्यंत मणिपूर मधील 35 हजार घरांमध्ये रिपाइं तर्फे अन्नधान्याचे मोफत वाटप केले आहे. तसेच रिपाइं( आठवले) आसाम चे राज्य अध्यक्ष हितेश देवरी यांनी आसाम च्या धेमाजी जिल्ह्यात आणि तेथील जोनाय विधान सभा मतदारसंघातील 5 हजार घरांमध्ये मोफत अन्नधान्य वाटप केले आहे. त्याचप्रमाणे नविदिल्लीत रिपाइं ( आठवले) सचिव तरुण लेखी हे मागील 34 दिवसांपासून आठवले अन्नपूर्णा रसोई नावाने दररोज किमान 600 लोकांना मोफत अन्नधान्य फळवाटप आणि चहा नाश्ता वाटप करीत आहेत.
दिल्लीत रिपाइं च्या वतीने सुरू असलेली ही आठवले अन्नपूर्णा रसोई तेथील गरिब मजुरांमध्ये लोकप्रिय झाली आहे. महाराष्ट्रात तर प्रत्येक जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते गोरगरिबांना अन्नाचा घास भरविण्यासाठी ;अन्नधान्य मोफत पुरविण्यासाठी दिवासरात्र मेहनत करीत आहेत. कोरोना या महामारीन घाबरता त्या विरुद्ध लढण्यासाठी जनजागृती करणारे आणि गरिबांना मदत करणारे माझे रिपब्लिकन कार्यकर्ते हे सुद्धा कोविड वोरियर्स आहेत. या माझ्या लढाऊ कार्यकर्त्यांचा योद्ध्यांचा मला अभिमान असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
