मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रभाव केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे.
याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका आहे. ‘लॉकडाउनमुळेच आपण करोनाला हरवू शकतो. लोकांनी घरी राहून लॉकडाउनचे नियम पाळावे. गर्दी टाळावी,’ असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘लॉकडाउनचे नियम लोकांनी पाळावेत. बाहेर गर्दी करू नये. गर्दीमुळे करोनाचा प्रदूर्भाव वाढत आहे. करोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही तर १७ मे पर्यंतचा लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा, असं मत आठवले यांनी मांडले.
‘महाराष्ट्रात १२ हजार ५०० लोकांना करोनाची लगाण झाली आहे. जगात गो कोरोना चा आम्ही नारा दिला. मात्र करोना काही जात नाही. महाराष्ट्रात ५०० पेक्षा जास्त लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाउन वेळेवर केला नसता तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता,’ असं रामदास आठवले यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

