अखिलेश कुलकर्णी : रामायण या दूरदर्शन वरच्या मालिकेने सर्वच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. कित्येकांच्या तर बालपणीच्या सुवर्णक्षणांपैकी एक असे स्थान निर्माण केले होते. गाव, शहर, जिल्हा, तालुका ज्याच्या कडे टीव्ही असेल त्यांच्या घरी हि मालिका बघण्यासाठी अक्षरशः जत्रा भरायची.
मालिका सुरु झाली कि एकदम शांतता पसरून एकही भाग न चुकवता सगळं रामायण बघण्यासाठी लगबग असायची. आता तेच दिवस परत येणार असल्याने नवीन पिढी ला किमान रामायण समजेल व ज्यांनी तेव्हा अनुभवलंय ते आता आठवणीत रमून नक्कीच या पिढीला देखील सांगतील.
होय, रामायण परत येतेय. याची खात्री खुद्द केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून दिली आहे.
जनता की मांग पर कल शनिवार 28 मार्च से 'रामायण' का प्रसारण पुनः दूरदर्शन के नेशनल चैनल पर शुरू होगा। पहला एपिसोड सुबह 9.00 बजे और दूसरा एपिसोड रात 9.00 बजे होगा । @narendramodi@PIBIndia@DDNational
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 27, 2020
यात त्यांनी म्हणले आहे कि, “जनतेच्या मागणीनुसार उद्या शनिवारी २८ मार्च पॅसिन रामायण याचे प्रसारण दुरदर्शनच्या नेशनल चॅनेल वर सुरु होणार आहे. पहिला भाग सकाळी ९.०० ते १०.०० आणि रात्री ९.०० ते १०.०० असा असेल.”
कोरोना मुळे सर्व देश बंद असून १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी व जमावबंदी असून नागरिकांना घरातच थांबायचे आवाहन करण्यात आले होते. अनेक चॅनल वरच्या मालिकांचे चित्रीकरण हे मागील आठवड्यापासुन बंद असल्याने मालिका देखील बंद होत दाबत व त्यामुळेच नागरिकांचे मनोरंजन व्हावे याउद्देशाने हे मोठे व चांगले पाऊल असल्याची प्रीतिक्रिया जनतेमध्ये पसरत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

