Share

शेवटी आपला तो आपलाच अन परका तो परकाच – राम शिंदे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणूक जवळ येताच राजकारणाला रंग चढताना दिसत आहे. आगामी काळात दृष्टिक्षेपात असणारी सगळ्यात रंगतदार लढत असेल ती म्हणजे कर्जत-जामखेड मतदार संघात. कारण येथून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात दंड थोपडले आहेत. त्यामुळे आतापासूनच या लढाईत आरोप प्रत्यारोपाची सुरवात झालेली दिसत आहे.

कर्जत तालुक्‍यातील 21 गावांसाठी संजीवनी देणाऱ्या तुकाई चारी योजनेसाठी 100 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले. अनेक पिढ्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने तुकाईचारीचा अनेक वर्षांचा प्रश्‍न मंत्रिपदाच्या माध्यमातून सोडविला. विविध विकासकामांसाठी भरभरून निधी, विविध योजना आणि खात्यांमधून आणण्याचे काम सातत्याने केले. यापुढेही मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणारच आहे. शेवटी आपल्यातला तो आपलाच अन परका तो परकाच एवढं मात्र खरं असे म्हणत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

कर्जत तालुक्‍यातील चांदे खुर्द येथे वालवड- चांदे खुर्द ते गुरवपिंप्री रस्ता डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, ज्या परिस्थितीत मी माझं आयुष्य जगलो आहे, ते आयुष्य माझ्या मतदाराच्या वाटेला येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या मतदारांना अभिमान वाटेल असे कार्य जलसंधारण खात्याच्या माध्यमातून केले आहे. अस देखील राम शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागामध्ये समृध्दी – प्रा. राम शिंदे

रोहित पवारांच्या मनसुब्यांना कॉंग्रेसचा ब्रेक, विधानसभा उमेदवारी धोक्यात

शपथ घेणारे तरी पक्षात राहतील का, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!