🕒 1 min read
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी गडावरील पुतळ्याच्या अनावरणावरून निर्माण झालेला वाद सुरूच असल्याचे चित्र आहे.भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सडकून टीका केली होती.शरद पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण हा अपमान आहे, अशी जळजळीत टीका केली होती. तसेच, शरद पवारांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होण्याआधीच पडळकरांनी कार्यकर्त्यांसह जेजूरी गडावर पोहचत पुतळ्याचे अनावरण केले होते.
रोहित पवार जामखेड तालुक्यातून जिथून आमदार म्हणून जातात, त्या मतदारसंघात चौंडीला अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुतळ्याचे अनावरणा दरम्यान केले होते. आता शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचा माजी मंत्री राम शिंदे यांनी आक्षेप घेतला असून नातवाच्या प्रेमा पोटी अहिल्यादेवी होळकरापेक्षा नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ कसा काय असू शकतो असा सवाल करत अहिल्यादेवीचा अवमान झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान आ. गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला असून, ते आपला वापर फक्त राजकारण आणि फक्त राजाकारणासाठीच करतात, अशी टीका केली आहे.पडळकरांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. एक व्हिडीओ शेअर करत पडळकरांनी पवारांवर टीका केली आहे.
शरद पवारांची अहिल्यादेवींवरती किती आस्था आहे? ते यावरूनच अधोरेखित होते. म्हणूनच मी म्हणतोय, ते आपला वापर फक्त राजकारण आणि फक्त राजाकारणासाठीच करतात. अशा या 'प्रस्थापित’ राज्यकर्त्यांचा जाहीर निषेध… जाहीर निषेध…
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) February 15, 2021
पडळकर म्हणाले की, स्वयंघोषित ‘जाणता राजा’ उर्फ मा.शरदचंद्र पवार साहेबांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावलाय… त्यांनी चक्क त्यांचे ‘लाडके’ रोहित पवार यांच्या मतदार संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, असे विधान काल ‘जेजूरी गडा’वरून केले.शरद पवारांची अहिल्यादेवींवरती किती आस्था आहे? ते यावरूनच अधोरेखित होते. म्हणूनच मी म्हणतोय, ते आपला वापर फक्त राजकारण आणि फक्त राजकारणासाठीच करतात. अशा या ‘प्रस्थापित’ राज्यकर्त्यांचा जाहीर निषेध, असे पडळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन
- आदिवासी भिल्ल समाजातील लोकांचे प्रश्न मार्गी लावणार-संदिपान भुमरे
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- पूजा चव्हाण प्रकरणात तपास करणारे पोलीसच दबावात आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
