🕒 1 min read
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा काल पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. सरसंघचालक मोहन भागवत कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सोहळ्यासाठा उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभे राहणार असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनानंतर उपस्थितांना संबोधित केले. नरेंद्र मोदींनी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले.
यावेळी मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या टपाल तिकीटाचेही अनावरण करण्यात आले. आज संपूर्ण जगभरात प्रभू रामाचा जयघोष होत असल्याचे सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या.
एका बाजूला हे सर्व घडत असताना या मुद्द्यावरून काही जणांकडून पुन्हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. राम मंदिर तोडून तिथे मशीद बांधली जाईल. त्या ठिकाणी मंदिर कधीच नव्हते, असे विधान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी केले आहे.
Islam says a mosque will always be a mosque. It can't be broken to build something else. We believe it was, and always will be a mosque. Mosque wasn't built after demolishing temple but now maybe temple will be demolished to build mosque: Sajid Rashidi, Pres, All India Imam Assn pic.twitter.com/DzlbYQ3qdm
— ANI (@ANI) August 6, 2020
साजिद रशिदी म्हणाले की, इस्लाम सांगतो की, मशीद नेहमी मशिदच राहते. अन्य काही बांधकाम केल्याने मशीदीचे अस्तित्व संपत नाही. बाबरी मशीद तिथे होती आणि नेहमीच मशिदीच्या रूपात तिथे राहील. मंदिर तोडून मशीद बांधण्यात आलेली नाही. मात्र आता असे होऊ शकेल. मंदिर पाडून तिथे पुन्हा मशीद बांधली जाईल.
दरम्यान, एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही राम मंदिर भूमिपूजनानंतर यावर नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या पदाचा अपमान केल्याची टीका त्यांनी केली होती. जिथे एकेकाळी मशीद उभी होती, तिथे मंदिराचे भूमिपूजन करणे हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव असून हिंदुत्त्वाचा विजय असल्याचे, ओवेसी यांनी म्हटले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
