मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असा टोमणा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
कोरोना सोबतच राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन पेटले आहे. आंदोलक आता थेट रस्त्यावर आले असल्याचं पाहायला मिळत आहे. याविषयी बोलताना दानवे म्हणाले,राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, केंद्र सरकार तर मदत करतच आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन
दरम्यान, आता रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “रावसाहेब दानवे यांनी ‘अमर-अकबर- अँथनी’ चित्रपट पूर्ण बघितलेला दिसत नाही. या चित्रपटात अमर, अकबर, अँथनी एकमेकांच्या पायात अडकून पडत नाहीत तर एकत्र मिळून खलनायकाचा नाश करतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार भाजपरुपी खलनायकाचा नक्कीच नाश करेल”, असा घणाघात राजू वाघमारे यांनी केला आहे.
रावसाहेब दानवे बरोबर म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार हे अमर, अकबर, अँथनीचं सरकार आहे. राज्य घटनेने सांगितलेलं सर्वधर्म समभावाचं हे सरकार आहे. हे सरकार अमर, अकबर, अँथनीचं आहे, हे आम्ही मान्य करतो”, असं राजू वाघमारे म्हणाले. “रावसाहेब दानवेंनी ‘अमर-अकबर-अँथनी’ चित्रपट पूर्ण बघितलेला दिसत नाही. या चित्रपटात अमर, अकबर, अँथनी एकमेकाच्या पायात अडकून पडत नाहीत तर एकत्र मिळून खलनायकाचा नाश करतात. या देशात खलनायक हा भाजप पक्ष आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार हे भाजपरुपी खलनायकाचा आगामी काळात नक्कीच नाश करेल”, असा घणाघात वाघमारे यांनी केला आहे.
देशात कोरोना पसरवणाऱ्या तबलिकींना भारतात ‘इतके’ वर्ष नो एन्ट्री…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

