Share

‘धैर्यशील माने फक्त देखाव्याला, अजूनही हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टीच’, रविकांत तुपकर यांचा टोला

Published On: 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद आज मंगळवारी जयसिंगपूर येथे पार पडली. या ऊस परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारवर स्वाभिमानीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. यावेळी रविकांत तुपकर यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर हल्लाबोल केला. ‘खासदार धैर्यशील माने नुसतं जॅकेट आणि कपडे घालून चालणार नाही. महापुरात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहे त्याकडे जरा लक्ष द्यावे’, असा टोला तुपकर यांनी लगावला.

धैर्यशील मानेंनी अभिनेत्यासारखी चांगली चांगली कपडे घातली म्हणजे चांगले खासदार होतील असे नाही. माने साहेब, तुम्हाला निवडून येऊन तीन वर्षे झाली, पण एकदाही कुठे गोरगरीब जनतेसाठी राबताना दिसला नाही. तुम्ही एकदा योगायोगाने निवडून आला आहे. इथल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांची कामे करा आमच्या भागात अजूनही हातकणंगले मतदार संघाचे खासदार राजू शेट्टीच असल्याचे सांगत तुपकर यांनी टीका केली. अतिवृष्टीने पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यावर हे ठाकरे सरकार बोलायला तयार नाही. मग यांच्या सोबत राहून काय उपयोग. राजू शेट्टींनी आमदारकीवर लाथ मारून सवथा सुभा मांडावा अशी भावना तुपकर यांनी यावेळी व्यक्त केली.

तर संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, ‘मराठवाडा, पश्चिम विदर्भात परतीच्या मान्सूनमध्ये प्रचंड हानी झाली. कापूस, भुईमुग, सोयाबीन, उडीद, मूग पाण्यात बुडाला. जिरायत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही त्यांची वर्षाची जगायची जिंदगी होती. ती सगळी पाण्यात वाहून गेली. त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. जर सरकारकडं खरोखर पैसे नव्हते, तर त्याच काळात सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना रोखीने ११ टक्के महागाई भत्ता कसा दिला? या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा केसानं गळा कापला. आता महाविकासआघाडीचे मंत्री दिवाळीला तुम्हाला गावात शुभेच्छा द्यायला येतील. तेव्हा हातात काळे झेंडे घेऊन त्यांचं स्वागत करा एवढीच विनंती आहे. खरंच तुम्हाला पूरग्रस्तांवर अन्याय झाला असं वाटत असेल तर यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका’ असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!