Share

Raju Patil । “मनसे भाजपा-शिंदे गटासोबत युती करणार का?”; राजू पाटील म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Raju Patil | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपा-शिंदे गट आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वीच शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या दीपोत्सव मेळाव्यातही हे तीनही नेते एकत्र दिसले होते. त्यामुळे या सर्व भेटीगाठी म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत तर नाहीत ना? अशा चर्चा सुरु आहेत. अशातच मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

राजू पाटील म्हणाले, “काही गोष्टी राजकारण सोडूनही बघितल्या पाहिजेत. सरकारमध्ये नसलेल्या आमच्यासारख्या पक्षाला जर सरकारकडून काही सकारात्मक प्रतिसाद येत असेल, आमच्या मागण्या मान्य होत असतील, तर अशा सरकारच्या जवळ येण्यास काही हरकत नसल्याचं ते म्हणालेत. मागच्या सरकारमध्ये कोणी आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हते. एखादी मागणी केली की, तर ती मागणी पूर्ण कशी होणार नाही, याकडे जास्त लक्ष दिले जात नसल्याचे राजू पाटील यांनी सांगितलं.

मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असतील किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) असतील यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे ही जवळीक वाढली आहे”, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. भविष्यात भाजपा-शिंदे गट-मनसे युती होणार का? असे विचारले असता, ते म्हणाले, “भापजा-शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये होण्याऱ्या भेटीगाठींचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, अशी जर युतीबाबत परिस्थिती निर्माण झाली, तर युती करायलाही हरकत नाही. अशी वेळ आली आणि राज ठाकरेंनी होकार दिला तर आम्हीही त्यासाठी तयार असू”, असं राजू पाटील (Raju Patil) म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या भेटींचा राजकीय अर्थ काढू नये असं म्हंटल होतं. दीपोत्सवाच्या कार्यक्रमात देखील राज ठाकरेंनी युतीचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तर गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा पक्ष आम्ही एकाच मताच असल्याचं म्हटलंय. आमचे विचार आणि ध्येय एकच आहे. त्यामुळे त्यात गैर काय आहे, असं वाटत नाही. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. मनसेबरोबरच्या युतीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असंही ते म्हणाले. आगामी निवणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!