नाशिक : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्त शहरात ठिकठिकाणी मनसेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. मात्र, विनापरवानगी लावण्यात आलेली राजकीय होर्डिंग्ज हटविण्यात आली. अशी कोणी राजकीय होर्डिंग्ज यापुढे लावली तर कारवाई होणारच, अशा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे. दरम्यान, त्यानंतर पोलीस आयुक्तांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.c
मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याशी झालेली भेट सौहार्दपूर्ण होती. महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ही भेट घेतल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. राजकीय पक्ष कोणताही असो नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई होणारच, असे पोलीस आयुक्त पांडे यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेने काल काढलेले होर्डिंग मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले. मनसे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये काल बाचाबाची झाली होती. महापालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मनसेचे होर्डिंग काढले होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे थांबले त्या हॉटेलच्या समोरच मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी रातोरात पुन्हा त्याच ठिकाणी होर्डिंग लावले. मनसे कार्यकर्ते आणि पालिका प्रशासनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘यापूर्वी तीन नगरसेवकांचा प्रभाग असताना राष्ट्रवादीला यश मिळाले होते,आताही पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील’
- उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी नाही तर पदासाठी तडजोड केली; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपाल आज सही करतील अशी अपेक्षा-हसन मुश्रीफ
- ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय
- पुण्यात उभं राहणार साखर संग्रहालय; राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

