Share

राज ठाकरेंची भूमिका राजकारणापालिकडली, छगन भुलबळांचे राज ठाकरेंच्या मागणीला समर्थन

Published On: 

नाशिक : राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मद्यविक्रीची परवानगी देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. या मागणीवर सामानातून वाईन, डाईन आणि फाईन. व्वा! राज बाबू!!’ या मथळ्याखाली खरपूस समाचार घेण्यात आला आहे. यानंतर आता शिवसेनेच्या भूमिकेला विरोध करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंच्या मागणीला समर्थन दर्शविले आहे.

छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या सूचनेला समर्थनं दिलं आहे. “राज ठाकरे यांची सूचना वास्तविक आणि राजकारणापलिकडची आहे,” असं सांगत भुजबळ यांनी त्यावर भाष्य केलं आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक स्थितीचीही त्यांनी माहिती दिली.

“करोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला. आता सरकारनं नागरी भागातील दुकानं उघडण्यास शर्थींसह परवानगी दिली आहे. ही दुकानं उघडावीच लागणार आहेत. करोना कधीपर्यंत थांबेल हे कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू पुरवल्या म्हणजे झालं असं होत नाही. घरात इतरही गोष्टी लागतातच. त्यामुळे लोकांमध्ये रागाची भावना निर्माण होते,” असं भुजबळ यांनी सांगितलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!