Share

महाविकासआघाडी सरकारच्या प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले..

Published On: 

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाविकासआघाडी सरकारच्या प्रभागरचनवेर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे. यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की,’प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन तीन बोट का दाबायची. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की,’कायदे वेगवेगळे का ? २-३-४ प्रभाग हा खेळ कसला? उद्या २-२ आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहे का? ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, महापालिकेला प्रभाग का? यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, कोर्टात जावं, निवडणूक आयोगाकडे जावं’. कुठलाही नगरसेवक काम करु देत नाही, प्रभागामध्ये कामं होत नाही. उद्या लोकांनी ठरवलं नगरसेवकाला भेटायचं आहे, तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? यांनी निवडणुकीची थट्टा करुन टाकली आहे. गृहित धरणं सुरु आहे त्याविरोधात लोकांनी कोर्टात जायला हव,’ असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, किती वैयक्तिक पातळीवर जायचे कळत नाही, साप काय बेडूक काय, सगळा बेडूक करुन टाकलाय कानफाटात काय मारु वगैरे, कुठल्या पदांवर आपण बसलोय हे ध्यानात ठेवायला हवं. हे सगळेच जण एकमेकांना फोन करुन सांगतात की काय कळत नाही, की आपण मुख्य प्रश्न बाजूला ठेवून या विषयांवर बोलू, मूळ प्रश्नांवर दुर्लक्ष करण्यासाठीच हे सुरु आहे की काय, टीव्ही, न्यूज चॅनलवरही तेच, यावेळी असेही असेही राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!