🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी राज्यात मद्यविक्रीची दुकाने सुरु करावीत अशी मागणी केली होती त्यानंतर शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. ABP माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा असं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
शिवसेनेने राज ठाकरेंच्या मागणीवर प्रश्न उपस्थित करत ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असा सवालही अग्रलेखातून उपस्थित केला होता.
राज ठाकरे यांनी आता म्हटलं आहे की, “काही जणांना वाटलं की मी तळीरामांची बाजू घेतली. यामध्ये तळीरामांचा काय संबंध येतो. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे तात्काळ पैसे कुठून येणार आहेत. काय मार्ग आहेत तुमच्याकडे ? हाच मार्ग आहे दुसरा कोणताच पर्याय नाही. याऐवजी कारखाने उघडा सांगतायत….मग उघडा. मी काही दारुचे गुत्थे सुरु करा सांगितलं नाही. महाराष्ट्रात लोकांना तुम्ही परवाने दिले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनच्या आधी काय दारुबंदी नव्हती. ही दुकानं सुरुच होती. हे खातं किती महत्त्वाची आहे ते संबंधितांना माहिती आहे. राज्याने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे”.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

