उत्तराखंड : मुसळधार पावसामुळे नेपाळमधील ३ मजूर ठार तर दोघे जखमी झाले आहेत. यामुळे हवामानात सुधारणा होईपर्यंत चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, रविवारपर्यंत हरिद्वार व ऋषिकेशला आलेल्या चारधाम यात्रेकरूंना हवामान सुरळीत होईपर्यंत पुढे न जाण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच या यात्रेतील मंदिरांसाठी ये-जा करणाऱ्या वाहनांची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
प्रवाश्यांना ऋषिकेशमधील चंद्रभागा पूल, तपोवन, लक्ष्मण झुला व मुनी-की-रेती भद्रकाली हे अडथळे पार करण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे.
यावेळी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी, तसेच रस्ते व महामार्गांची स्थिती जाणून घेण्यासाठी येथील सचिवालयातील राज्याच्या आपदा व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट दिली आहे. त्यामुळे हवामान सुरळीत होईपर्यंत यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’

