टीम महाराष्ट्र देशा : देशात प्रवासासाठी सुरक्षित प्रवासासाठी सर्वात प्रथम विचार केला जात असेल तर तो आहे रेल्वे प्रवास… परंतु, अनेकदा रेल्वे प्रवासात आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यावेळी अशा अडचणींची तक्रार नक्की दाखल कुठे आणि कशी करायची? आणि तक्रार दाखल केल्यानंतरही त्यावर विचार होईल किंवा नाही याची खात्री नसते. त्यामुळे अनेक जण तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करतात. परंतु, यावरच उपाय म्हणून आणि रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी रेल्वेनं प्रवाशांसाठी काही सोपे पर्याय उपलब्ध करून दिलेत. ज्याद्वारे प्रवासी सहजगत्या आपल्याला आलेल्या अडचणींची तक्रार प्रशासनापर्यंत पोहचवू शकतील. तसंच या तक्रारींची वेळोवेळी दखलही घेण्यात येईल.
स्टेशन, रेल्वेत अस्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, नेहमीच होणारा उशीर, रेल्वेत आणि स्टेशनवर होणारी चोरी अशा प्रकारच्या रेल्वे प्रवासाशी निगडीत तक्रारी तुम्ही भारतीय रेल्वेकडे दाखल करू शकता.रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं रेल्वेन 139 या एकाच क्रमांकात एकत्रीकरण केलं आहे.
या क्रमांकावर 12 भाषातून माहिती उपलब्ध असेल. कोणत्याही मोबाईल फोनवरून या क्रमांकावर फोन करता येणार असल्यानं सर्व मोबाईल धारकांना त्याचा वापर करणं शक्य होणार आहे. सध्याच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांच्या जागी 139 हा नवा क्रमांक कार्यरत होईल. प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं सोयीचं होईल आणि प्रवासादरम्यान त्यांच्या कोणत्याही गरजांसाठी ते रेल्वेशी संपर्क साधू शकतील.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

