Share

एका दिवसात देशभरात कोरोनाचे पन्नास हजारांहून अधिक रुग्ण, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे अनलॉक सुरू झाले असले तरी दररोज देशभरात कोरोनाचे पन्नास हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने सरकारसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी २४ तासांत भारतामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडल्याचा आलेख ट्विटरवर शेअर केला. तसेच त्याखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक विधान उपहासात्मक पद्धतीने ट्विट केले. मोदींच्या म्हणण्यानुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने कोरोनाच्याबाबतीत इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान २७ जुलै रोजी केले होते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने कोरोनाच्याबाबतीत इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. आज भारतात दररोज पाच लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. येणाऱ्या काही आठवड्यात हे प्रमाण 10 लाखांपर्यंत वाढवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!