Share

‘माझ्या चेतावणीची दखल घेऊन नियमांत सुधारणा केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो’ : राहुल गांधी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे त्यामुळे देशातील बहुतांश उद्योगधंदे आणि कंपन्या बंद आहेत आणि मंदी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे . याचा विपरीत परिणाम म्हणून भांडवली बाजारात घसरण होऊन कंपन्यांचे बाजार मूल्यात कमालीची घट झाली आहे.

याचबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी १२ एप्रिल रोजी सरकारकडे थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांत बदल करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले होते, ‘प्रचंड आर्थिक मंदीमुळे अनेक भारतीय कॉर्पोरेट्स त्यांचे अधिग्रहण करण्यासाठी आकर्षक लक्ष्य बनले आहेत. राष्ट्रीय संकटाच्या वेळी सरकारने कोणत्याही भारतीय कॉर्पोरेटचा ताबा परदेशी कंपन्यांना घेण्यास परवानगी देऊ नये.’

केंद्र सरकारचे पाऊल –

या मूल्य घसरणीचा फायदा घेऊन चीनी कंपन्या भारतीय कंपन्यांचे कमी किमतीत अधिग्रहण करू शकतात, हा धोका ओळखून केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांत बदल केले आहेत. आता परकीय कंपनीला भारतीय कंपनीचे अधिग्रहण करत असताना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबतची माहित अर्थ मंत्रालयाने ट्वीटरवर दिली आहे.

राहुल गांधींचे आभार-

आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे. त्यांनी म्हटलंय माझ्या चेतावणीची दखल घेऊन एफडीआयच्या नियमात सुधारणा केल्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. आता थेट परकीय गुंतवणूकीच्या काही विशिष्ट प्रकरणांमध्ये सरकारची मान्यता बंधनकारक करण्यात आली आहे .’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!