🕒 1 min read
मुंबई: कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असल्याच ट्विट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल आहे.
मुंबई मधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.#KamalaMills— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 29, 2017
काल मध्यरात्रीच्या सुमारास कमला मिल्स कंपाऊंडमधील एक हॉटेल व पब मधे आग लागली. यामधे 14 जनांचा गुदमरुन मृत्यु झाला आहे तर अन्य 16 पेक्षा जास्ती लोक यामधे जखमी झाले आहेत. मृतांमधे महिलांच प्रमाण अधिक आहे.
हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
