Share

जो नफ़रत करे,वह योगी कैसा; राहुल गांधींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

 नवी दिल्ली- आगामी काळात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘अब्बा जान’ या टिप्पणीवरून आता राजकीय वादंग सुरू झाल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच कुशीनगरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांवर विशेषकरून समाजवादी पार्टी (सपा)वर निशाणा साधला आणि आरोप केला की, समाजवादी पार्टीचे सरकार गरिबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहचवत होते. २०१७ च्या अगोदर गरिबांना रेशन का नव्हते मिळत? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहचत होतं. आज गरिबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल.

दरम्यान, योगी आदित्यानाथांनी वापरलेल्या अब्बा जान शब्दावरून कॉंग्रेस नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.यातच आता कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टीका केली आहे. जो नफ़रत करे,वह योगी कैसा असं ट्वीट करत योगी आदित्यनाथ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!