Share

पुलवामा दहशतवादी हल्ला : देशाच्या सैनिकांवर होणार हल्ला हा घृणास्पद – राहुल गांधी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याची निंदा केली. राहुल गांधी यावेळी म्हणाले की,या  दहशतवादी हल्ल्याचा उद्देश देशाचे विभाजन करणे हा आहे. पण आम्ही देशाचे विभाजन होऊन देणार नाही. आम्ही सर्व विरोधी पक्ष देशाच्या सैनिकांच्या बरोबर आहोत तसेच शाहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांच्या पाठीशी ठाम पणे उभे आहोत. हा हल्ला देशाच्या आत्म्यावर झाला असून अशाप्रकारचा देशाच्या सैनिकांवर होणार हल्ला हा घृणास्पद आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले कि , ही  वेळ शोक, दुःख आणि सन्मानाची आहे. आम्ही भारत सरकार आणि भारतीय सैन्याच्या पाठीशी आहोत. तसेच आमच्या देशाची जडण घडण ही प्रेम आणि शांती यावर झाली आहे त्यामुळे अशाप्रकारची कोणतीही हिंसक शक्ती देशाला नुकसान पोहचवू शकणार नाही.

गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले असून २० जवान जखमी झाले. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!