Share

नांदेडमधून राहुल गांधी नाही तर अमिता चव्हाणच लढणार लोकसभा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदार संघाबरोबर महाराष्ट्रातून नादेद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची शक्यता असल्याची बातमी समोर येत होती मात्र नांदेड लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातून निवडणूक लढविण्याच्या चार्चेंना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, राहुल गांधी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असल्याच्या केवळ अफवा होत्या असं कॉंग्रेसमधील खात्रीलायक सूत्रांनी सांगितल आहे. तर अमिता चव्हाण यांनी निवडणुकांची तयारी देखील सुरु केली आहे. तसेच अशोक चव्हाण हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं देखील निश्चित झाल्याच कॉंग्रेस मधील सूत्रांनी सांगितल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच राहुल गांधी हे देखील दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मोदी लाटेत देखील महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदार काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात यश आले. त्यामुळे राहुल यांच्यासाठी नांदेडच्या जागेची चाचपणी केली जात होती.

या मतदार संघाचे विद्यमान खासदार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी देशातील कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतात. ते जेथून लढतील त्या ठिकाणाहून किमान 4 ते 5 लाखाच्या मताधिक्याने ते विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. राहुल गांधी महाराष्ट्रातून लढल्यास गुजरात, कर्नाटक, तेलगंणा या आजूबाजूच्या राज्यांतही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल. 1980 पासून नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. 1989 मध्ये जनता दल तर 2004 मध्ये भाजपा उमेदवार या ठिकाणाहून विजयी झाले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!