🕒 1 min read
नवी दिल्ली : RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील लॉकडाऊनबाबत भाष्य केले आहे. शून्य संख्येनंतरच लॉकडाउन उघडला जाईल हा विचार चुकीचा आहे, असे रघुराम राजन यांनी म्हंटल आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे हळूहळू सुरु करावे लागतील, असेही ते म्हणाले आहेत. तर प्राधान्यक्रम निश्चित केला तर कोरोनानंतर भारत जगात एक मोठी भूमिका बजावू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा येत्या ३ मे रोजी पूर्ण होणार आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योगधंदेही बंद आहेत. त्याचाच परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. यादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की , शून्य संख्येवरच लॉकडाउन उघडला जाईल असं वाटत असेल तर ते अशक्य आहे,” असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसच त्यांनी सद्यस्थितीत गरीबांची मदत करणं महत्त्वाचं असल्याचं सांगत यासाठी सरकारनं ६५ हजार कोटींचा निधी देणं आवश्यक असल्याचंही सांगितलं.
कोरोनानंतर भारत जागतिक पातळीवर एक मोठी भूमिका बजावू शकतो. कोरोनाचं संकट संपल्यानंतर जगात मोठे बदल होतील. त्यामध्ये भारत आपलं वेगळं स्थान निर्माण करू शकतो. त्यासाठी आपण आपले प्राधान्यक्रम निश्चित करायला हवेत. आरोग्याच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात, असं राजन यांनी सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
