Share

बापरे ! सोनोग्राफी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टला कोरोना पण सुदैवाने ६२ गर्भवती महिलांचे अहवाल निगेटिव्ह

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढतच आहे. राज्यातील १४ जिल्हे हॉट स्पॉट वर असल्याचे समजते आहे. पुण्यातील शिक्रापूरमध्ये एका सोनोग्राफी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टला कोरोनाची लागण झाली आहे.

सोनोग्राफी करणाऱ्या या व्यक्तीला कोरोना झाल्यामुळे ६२ महिलांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या महिला ६ एप्रिल ते ८ एप्रिलदरम्यान सोनोग्राफी करणाऱ्या या व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या. मात्र या संपूर्ण ६२ महिलांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या सर्व महिलांचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीला चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ ए. प्रसाद यांनी सांगितल्या नुसार क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोणत्याही गरोदर महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली नाहीत.

आपल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये या रेडिओलॉजिस्टने ६९ जणांची सोनोग्राफी केली होती. यातील ६२ गर्भवती महिलांना प्रशासनाने शिक्रापूर परिसरातील चार हॉटेल लॉजमध्ये आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या टीमच्या देखरेखी खाली क्वॉरंटाईन केले आहे. तसेच, यातील काही महिलांची डिलिव्हरी झाल्यामुळे या महिलांना आहे त्याच ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!