Share

जयंत पाटलांकडून आर. आर. पाटलांच्या ‘त्या’ सल्ल्याचा खुलासा; म्हणाले…

Published On: 

सांगली : सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर भाष्य करत त्यांनी गृहमंत्रीपद का नाकारले होतं यासंदर्भात पाटील यांनी खुलासा केला आहे.

यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, ‘अजित पवार यांनी सांगितलं की जयंत पाटलांना गृह खात्याविषयी विचारलं तर त्यांचा बीपी वाढला. खरंच तसेच झाले होते. मी गृहमंत्री व्हायच्या आधी मी आणि अनिल बाबर एका लग्नात गेलो. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील देखील या लग्नाला होते. २००९ ला आर. आर. आबांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता. तेव्हा मला पक्षाने सांगितले होते की तुम्हाला हे खातं घ्यायचे आहे. मी आबांना विचारले की हे कसे खाते आहे? तेव्हा आबांनी विचारले, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? मी म्हटलं अजिबात नाही. डायबेटिस आहे का? अजिबात नाही. मग आर. आर. पाटील म्हणाले, गृहखातं घ्या, या दोन्ही गोष्टी होतील.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मागील काही वर्षांत राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्याकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे, बदली करण्याची धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. यातून केवळ समोरच्याचे समाधान होते, परंतु पोलिसांना त्यांचे काम करू द्या. पोलिसांचं मनोधैर्य वाढवावे लागेल. राजकीय नेत्यांनी त्यांना पाठबळ द्यावे लागेल. केसेस आणि बदली कामा पुरतेच पोलीस ठाण्यात येऊ नका, पोलिसांना पाठबळ देण्यासाठी पण या’, असे म्हणत त्यांनी राजकीय नेत्यांवर टीकास्त्रांचा वर्षावही केला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!