Share

दु:खाची कड बाजूला ठेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली मदत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही… कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या या कवितेतील भावना प्रशांत भास्कर जोशी आणि त्यांचे कुटुंबीय प्रत्यक्ष अनुभवत आहेत. नुकतेच सामाजिक न्याय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या प्रशांत जोशी यांच्या आईचे म्हणजे सौ. इंदुबाई भास्करराव जोशी यांचे निधन झाले. आज त्यांच्या मातोश्रीच्या चौदाव्या दिवसाचा गंगापूजनाचा (गोडजेवण) कार्यक्रम होता.

आईची आठवण आणि मनात दाटून आलेली दु:खाची कड बाजूला ठेवून त्यांनी सामाजिक जाणीवेतून परंपरेला फाटा दिला. प्रशांत जोशी यांनी आईच्या चौदाव्याचा गोडजेवणाचा कार्यक्रम टाळून त्याचा 25 हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला.

आज संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत आहे. आपला देश आणि आपले राज्यही पूर्ण क्षमतेने या युद्धात उतरलं आहे. आपल्या सगळ्यांना मिळून कोरोनाला हरवायचच आहे. गर्दी टाळून- शिस्त पाळून. मग आईचा चौदाव्याचा कार्यक्रम कसा करणार? त्यापेक्षा तिच्या नावे फुल ना फुलाची पाकळी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचा निर्णय जोशी कुटुंबियांनी घेतला आणि तो अंमलातदेखील आणला.

या ‘गोड जेवणाला’ आई जाण्याच्या दु:खाची किनार असली तरी सामाजिक जाणीवेचे कोंदण आहे. असे अनेक मदतीचे हात या दानशूर महाराष्ट्रातून पुढे येत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करून मदत करत आहेत.

राज्यातली लहानगी चिमुरडी मंडळी वाढदिवसाचा खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहेत तर कुणी वस्तू स्वरुपात मदत करत आहे. याच दातृत्व भावाने केलेल्या मदतीमुळे आणि सहकाऱ्यांच्या हातांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईला आत्मबळ लाभत आहे. या सर्वांच्या दातृत्वभावाला खरंच मनापासून सलाम करावासा वाटतो.

कोविड 19 या विषाणूशी लढताना ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपली मदत देऊन या युद्धात सहभागी व्हायचे आहे, अशांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 हे स्वतंत्र खाते उघडण्यात आले आहे. या खात्याचा तपशील असा आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19

बचतखाते क्रमांक ३९२३९५९१७२०
स्टेट बँक ऑफ इंडिया, मेन ब्रॅण्च
फोर्ट, मुंबई ४०००२३
ब्रॅण्च कोड ००३००
आयएफएससी कोड SBIN0000300

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!