Share

“कोरोना काळात कुंभमेळा व्हायलाच नको होता”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मात्र या बिकट परिस्थितीत देखील हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा भीती व्यक्त केली होती. यातच आता, या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.

गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी कुंभमेळ्यातील या गर्दीवर संताप व्यक्त केला. आता या पार्श्वभूमीवर गायक सोनू निगमने एक व्हिडीओ शेअर केला आहे. कोरोनाची लाट असताना कुंभमेळ्याचे आयोजन करायलाच नको होते, अशी भूमिका या व्हिडीओत त्याने मांडली आहे. मोठ्या बहिणीच्या पतीला कोरोना झाला असून सध्या ते दिल्लीच्या रूग्णालयात आयसीयूमध्ये भरती असल्याचेही त्याने या व्हिडीओत सांगितले आहे.

https://www.instagram.com/tv/CNzDqZyhg1r/?utm_source=ig_web_copy_link

मी दुस-या कुठल्या गोष्टीबद्दल बोलणार नाही. पण मी हिंदू कुटुंबात जन्मलोय. हिंदू या नात्याने म्हणू शकतो की, कुंभमेळा व्हायलाच नको होता. देवाची कृपा की, आत्ता केवळ सांकेतिक झाला आहे. हा श्रद्धेचा मुद्दा आहे, मान्य आहे. पण संपूर्ण जगात सध्या जी काही स्थिती आहे, ती बघता लोकांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. अशाकाळात शो सुद्धा व्हायला नकोत. कुठलाही शो सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व्हायला हवा. पण तूर्तास नाहीच, असे सोनूने त्याच्या व्हिडीओत म्हटले आहे.

https://www.instagram.com/tv/CNz8pZ0hLUI/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!