Share

‘कोरोना’चा कहर : पुण्यात कोरोनाबळींचा आकडा 100 वर

Published On: 

पुणे : देशासह राज्यात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने मुंबई व पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता पुण्यातील कोरोनाबळींची संख्या वाढली आहे.

पुण्यातील घोरपडी परिसरात एका 68 वर्षीय संशयित रुग्णाला 21 एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट 24 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. या कोरोनाबाधित रुग्णाचा 2 मे रोजी मध्यरात्री मृत्यू झाला आहे.

यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा 100 वर पोहोचला आहे. तसेच काल पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 815 वर पोहोचला आहे.

दरम्यान, आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!