Share

#Musical_Lockdown : पुणे पॉडकास्टने कानसेनांसाठी आणली नवी पर्वणी, संगीत क्षेत्रातील कलाकारांची ऐका कहाणी

Published On: 

पुणे : कोरोनाचा फटका आज सिनेजगताला देखील बसला आहे. अनेक चित्रपट, सिरियल्स, गाण्यांचे – नृत्यांचे कार्यक्रम हे सध्या बंद आहेत. सर्वचं कार्यक्रमांचे शूटिंग देखील थांबले आहे. त्यामुळे आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी पुणे पॉडकास्टने नवीन उपक्रम हाती घेत टॉक स्टुडिओ हा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

यावर संगीत क्षेत्रातील मंडळी आपल्या संगीता बद्दल, आपल्या प्रवासाबद्दल, आणि संगीत क्षेत्रात होणाऱ्या बादलांबद्दल बोलण्यासाठी व आपली कला सादर करण्यासाठी येत आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक लाईव्ह म्युझिक कार्यक्रम बंद झाले आहेत. मात्र टॉक स्टुडिओच्या माध्यमातून या लाईव्ह म्युझिक कार्यक्रमची कमी भरून काढण्याच जात आहे. अनेकांनी पुणे पॉडकास्टच्या या नवीन कार्यक्रमाला पसंती दिली आहे. तर हा कार्यक्रम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान आतापर्यंत या कार्यक्रमात गायिका बेला शेंडे, गायिका अन्वेषा, कागर, धुराळा चित्रपटाचे संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा, जगातील पहिल्या महिला विचित्र विना वादक डॉ. राधिका विना साधिका, मुरंबा सिनेमाचा संगीतकार सौरोभ भालेराव, असे अनेक मंडळी सहभागी झाले आहेत. तर येत्या काही दिवसातचं सेक्रेडे गेमचे म्युझिक डायरेक्टर अलोकनंदा दास गुप्ता आणि सिम्फॉनी ऑर्केस्ट्राचे डायरेक्टर मर्ट बिसेनगॅलिव्ह हे दोन अंतरराष्ट्रीय कलाकार आपला जीवन प्रवास शेअर करण्यासाठी येणार आहेत. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे होस्ट हे फर्जंद चित्रपटाचे संगीतकार देवदत्ता मनीषा बाजी हे स्वतः करत आहेत.

शुभम कुलकर्णी आणि अद्वैत बारटक्के हे गेली 2 वर्ष पुणे पॉडकास्ट या युट्युब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असतात. सध्या त्यांचा हा नवीन उपक्रम चांगलाचं प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!