Share

करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

पुणे –  करोना आजार होऊ नये याकरिताआवश्यक दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे, याबाबत पुणे मनपाचे वतीने सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त शेखर गायकवाड तसेच अतिरिक्त मनपा आयुक्त ( जनरल ) रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे.

पुणे मनपाच्या डॉ.नायडू सांसर्गिक रुग्णालयात विलगिकरण विशेष कक्ष सुरू करण्यात आलेला असून अद्याप पर्यंत एकही रुग्ण आढळला नसल्याचे मनपा आरोग्य प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे यांनी कळविले आहे. करोना आजार हा नवीन असून यावर निदान करण्याची व्यवस्था पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत आहे त्यामुळे अशा संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी या विज्ञानसंस्थेत पाठविले जाणार आहे. तसेच संशयित रुग्णांना नायडू रुग्णालय व मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करता येणार आहे.

करोना आजाराची सर्वसामान्य लक्षणे-

सर्दी,खोकला ( कॉमन कोल्ड ),गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे, श्वास घ्यायला त्रास होणे,श्वसनास अडथळा, न्यूमोनिया.

पचनसंस्थेच लक्षणे- -अतिसार. काही रुग्णामध्ये मूत्रपिंड निकामी होणे, प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तीमध्ये असामान्य लक्षणे आढळू शकतात.

सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरूप लक्षात घेता हा आजार होऊ नये यासाठी

खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे

श्वसन संस्थेचा आजार असलेलया वयक्तीचया निकट सहवास टाळणे, हाताची नियमित स्वच्छता, न शिजलेले अथवा अपुरे शिजलेले मांस खाऊ नये, फळे, भाज्या,न धुता खाऊ नये,खोकताना शिंकताना नाकातोंडावर रुमाल,टिशू पेपर वापर करावा,अशा वापर केलेल्या रुमाल,टिशू पेपर लगेच व्यवस्तीत असलेल्या कचरा पेटीत टाकावेत.

खालील व्ययक्तींनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यावा

श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्ती, हा त्रास कोणत्याआजारामुळे, विषाणूमुळे होत आहे हे स्पष्ट होत नसल्यास आणि रुग्णाने मध्य पूर्वेस नुकताच प्रवास केला असल्यास,
प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच नवीन करोना विषाणू बाधित देशात प्रवास केला आहे, रुग्णास उपचार देणाऱ्या डॉक्टर्स, आणि आरोग्य कर्मचाऱयांना सदर आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो याकरिता रुग्णास उपचार करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचारी यांनी सुयोग्य संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण पद्धती वापर करणे आवश्यक आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!