Share

पुणे विभागातील कोरोनाचे ४१० रुग्ण बरे होऊन घरी ; विभागात आतापर्यंत कोरोना बाधित २०८७ रुग्ण

Published On: 

पुणे दि.2 :– पुणे विभागातील ४१०  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ हजार ८७  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण १ हजार ५६६ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७९ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात २ हजार ८७ बाधित रुग्ण असून १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात १ हजार ८७६ बाधीत रुग्ण असून १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात ५४ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात १११ बाधीत रुग्ण असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात ३२ बाधीत रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात १४ बाधीत रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण २१ हजार ५९९ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी २० हजार ७६७ चा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी १८ हजार ६१३ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून २ हजार ८७ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील ६९ लाख ४ हजार ९१८ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत २ कोटी ६८ लाख ५६ हजार ९१८  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी १ हजार ५९० व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!